सावज !



पानातून सांडलेलं उन पिऊन,
मातलेल्या केवड्याचा गंध;
अंधुक अंधुक उजेडातून,
रापलेल्या देहाचा रंग;
वक्षांवरून पसरलेले –
दोन आंधळे नाग;
पाखरांना भूल पडते,
अशा श्वासांचा पहारा;
भूर भूर वाऱ्यावर,
निळी-हिरवी साद घालत,
भटकणारा राघू केधवा,
विवरातून अडखळतो,
जहरी अंधार-ओढीने –
सावज असा सापडतो.

Comments

Popular Posts