अता बरसशील
हसत , झोकात
सखा साजण माझा
विरघळे मिठीत !
लागले तृप्तीचे
डोहाळे छपरास
भरू आला मेघ
माझा जीव कासावीस !
रोवत तुझ्या
सुगंधी टाचा
भरत येतोस
मोकळ्या खाचा !
पाट अत्तराचे तुझ्या
वाहती दारातून
हे झिरपती माझ्या
खोल खोल हाडातून !
असा बरस तू पुन्हा
माझी चातकाची प्यास
मोहरलं झाड तुझं
माझं घरटं भकास !
पिकली पानं गळतात... मातीत रुजतात...नवे अंकूर जन्म घेतात...वृक्ष उमलतात...नियतीचं चक्र फिरत राहतं... आणि आपण - आपण हा सोहळा डोळ्यात जागवत जगतो... ते मिटेपर्यंत !
Friday, April 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
डोह
आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान जड पंखात साठवून फिरत राहतो स्मरत रा...
-
गडद झाडीचा रंग ओथंबून ओघळतो पाठीवर मानेवरून कांकणभर पाउस ठिबकतो वाहतो धुकट ओल्या बोटातून आभाळभर पाणी वाऱ्यानं हलावं तशी तुझी पावले...
-
पानातून सांडलेलं उन पिऊन , मातलेल्या केवड्याचा गंध ; अंधुक अंधुक उजेडातून , रापलेल्या देहाचा रंग ; वक्षांवरून पसरलेले – दो...
-
जाणवलं; तुझ्या बिलोरी डोळ्यात पाहताना. आठवलं; अता उकीरड्या जगात फिरताना. कळेल; दिवस कूस बदलेल तेव्हा. नाहीच कळालं कधी, तर अजून एक सं...
No comments:
Post a Comment