Thursday, January 27, 2011

भेट (बुध., ११/१०/२००६ - १२:४२)

भूलून गेलो , उडून गेलो, प्रीतवारा भिरभिरला
लूटून नेला गर्भ उद्याचा, वर्तमानही हादरला !
सौंदर्याची सीमा आम्ही ठरवली नव्हती
पुरी झाली खात्री अता, खट्याळ मनाला!
बट मागे सारताना, पदराशी खेळताना;
हाय अशी लाजलीस, त्या उपमा कशाला ?
दूर तू उभी असून ,भासतेस जवळ तू
अपुल्यातील अंतराचा, श्वास बरा संपला !
शब्द सारे कुचकामी, तव अधरांवर लडबडले
सांडलीच मदीरा मग , काळ झिंग झिंगला!
उरी माझ्या काळजाची , धडधड या थांबेना
कसलयाशा वेदनेने , क्षण पुरा थरारला !

No comments:

Post a Comment

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...