Monday, July 2, 2012

होड्या

केल्या होत्या तेव्हा
शिडाच्या असंख्य होड्या
आता आठवत नाही
नेमक्या कधी!
कौलांवरून खाली
अन चिंचेच्या बाजूने
वहायचा मी होड्यातून
नदीपर्यंत!
पात्र नदीचं मोठं होत जायचं
मी लहान होत जायचा
होड्या बुडून गेल्यावरही
तरंगत राहायचा!

No comments:

Post a Comment

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...