Monday, July 9, 2012

वातीचं देणं

फुलपाखरांच्या पंखातून
बेमालूमपणे निसटणाऱ्या
रंगांचं;
इंद्रधनुच्या कुंचल्यातून
आभाळ गिरवणाऱ्या
हातांचं;
चंद्राच्या एका इशाऱ्यावर
आसमंतात झेपावणाऱ्या
लाटेचं;
हृदयाच्या काजळी समईत
दिवस-रात्र जळणाऱ्या
वातीचं;
देणं आहे माझं
कित्येक जन्मांचं !


No comments:

Post a Comment

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...