Saturday, August 17, 2013

मेघ !


गडद झाडीचा रंग ओथंबून
ओघळतो पाठीवर मानेवरून
कांकणभर पाउस ठिबकतो
वाहतो धुकट ओल्या बोटातून
आभाळभर पाणी वाऱ्यानं हलावं
तशी तुझी पावले पडतात
काळाहून मंद,
तमाइतकी सावध,
पंचमावर तोल सावरीत
धैवतावरून कोसळतात
मत्त चालींची सुप्त गीतं
तेव्हा घ्यायचा असतो थोडा श्वास
हवी असतांत काही उत्तरं !

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...