पानातून
सांडलेलं उन पिऊन,
मातलेल्या
केवड्याचा गंध;
अंधुक
अंधुक उजेडातून,
रापलेल्या
देहाचा रंग;
वक्षांवरून
पसरलेले –
दोन आंधळे
नाग;
पाखरांना
भूल पडते,
अशा श्वासांचा
पहारा;
भूर भूर
वाऱ्यावर,
निळी-हिरवी
साद घालत,
भटकणारा
राघू केधवा,
विवरातून
अडखळतो,
जहरी अंधार-ओढीने
–
सावज असा
सापडतो.