Thursday, August 1, 2024

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात
तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी -
झेप घेऊन, पांगलेला जीव
कधीही ना शमणारी तहान 
जड पंखात साठवून फिरत राहतो 
स्मरत राहतो निसरडे क्षण! 
तू बरसताना, तुझ्याच आडोशाला -
बसून पाहिलेल्या धगधगत्या जाणिवांचे 
मखमली क्षण! 

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...