तू कूस बदलल्यावर
खिडकीतून उडणाऱ्या
रसरसलेल्या थेंबात
अर्थ कितीसा उरतो ?
तू कूस बदलल्यावर
झोप रुसून गेलेल्या
डोळ्यातील अमावस्येत
चंद्र कितीसा उरतो ?
तू कूस बदलल्यावर
माझ्यातल्या पावसात
आणि बरसत्या देहात
जन्म कितीसा उरतो ?
खिडकीतून उडणाऱ्या
रसरसलेल्या थेंबात
अर्थ कितीसा उरतो ?
तू कूस बदलल्यावर
झोप रुसून गेलेल्या
डोळ्यातील अमावस्येत
चंद्र कितीसा उरतो ?
तू कूस बदलल्यावर
माझ्यातल्या पावसात
आणि बरसत्या देहात
जन्म कितीसा उरतो ?
तुझ्या कविता वाचल्यावर
ReplyDeleteमी माझा कितीसा उरतो ?