Friday, August 10, 2012

सवाल

तुझ्या डोळ्यांच्या काठावर कलंडलेले थेंब...
उसने देशील का?...
तुझ्या हातातला मखमली रुमाल...
विसरू जाशील का?...
तुझ्या उनभिजल्या ओठावरचे शब्द...
बोलशील का?...
तुझ्या नजरेची पाषाण शिळा...
फोडून जाशील का?...
तुझ्या रंगरुसल्या चेहऱ्यातलं हसू...
पोसशील का?... 

No comments:

Post a Comment

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...