Thursday, May 31, 2012

चाफा

चाफा अजून फुलतोच आहे
वेचणारा हात कुठे दिसत नाही
नभांच्या पिसाऱ्यातून हलणारा
तो जांभळा ढग कुठे दिसत नाही
आभाळ झुलवणारे थवे पक्षांचे
अन त्यांचा गोफ कुठे दिसत नाही
सांज वाहणारे पावसाळी डोळे
अन साचलेली रात कुठे दिसत नाही ...

Wednesday, May 30, 2012

आडवाट

रस्त्या-रस्त्यावर मांडलेला,
गावा-गावात पुजलेला,
नियतीला सुचलेला,
सत्वाचा व्यभिचार;
चुकवत चुकवत आली
झाडाच्या काळ्याभोर,
अन अजिंक्य ढोलीत
एका पक्ष्याची आडवाट...

Friday, May 25, 2012

कातळ

भरू येतो श्वास
तुझी मिटली ओंजळ
लागे आस सख्या होई
गर्द डोळ्यांचे कातळ

Thursday, May 24, 2012

गाणे

अर्थांचा एक अनामिक यात्रिक
शब्दांच्या वाटांवरती गातो
गाणे विटलेले थकलेले
गाणे आतून आतून फुटलेले ...

Wednesday, May 23, 2012

दुपार

ग्रीष्मातली दुपार, तू, आणि मी ..........
जेव्हा भेटतो वडाच्या फिकट सावल्यांत
कधी तू माझ्यात, कधी उन्हात ..........
आणि ओशाळलेली दुपार पारंब्या-पारंब्यात

Friday, May 18, 2012

आर्जव

पानातून गळला चंद्र साजणी ......
रातीच्या गाली झुले दव .............
वाऱ्याला आली पेंग जराशी .........
मिटली कळी त्या करी आर्जव .....

Thursday, May 17, 2012

कधी मी

कधी मी, शब्दांवर अर्थाचे सावट ......
कधी मी, अर्थातील जळता पारा ......
कधी तव नयनातील आभाळी .........
मी लुकलुकणारा तारा .....

Wednesday, May 16, 2012

गजरा

तुला गजरा माळताना पाहिलं ........
...मन फूल फूल गुंतताना पाहिलं !

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...