स्वप्नांच्या मखमली आश्वासनांवर विसंबून उताणी पडलेली रात्र आठवली की काळजात चर्र होतं. कधी काळी याच रात्रीच्या आळोख्या-पीळोख्यांवर जीव ओवाळून टाकला होता. स्वप्नं असतातच जहरी, दिवस-रात्र धडपडणाऱ्या उरातील श्वासास फूस लावून पळवून नेणारी. नशिबाचे वादळी तडाखे बसले आणि नियतीनं दाखवली पाठ की मग येते जाग, मग शोधतात स्वप्नं आसरा, स्वतःच कालवलेल्या विषारी मनात; मग घेता येतो रात्रीच्या केसांतला मोगरी श्वास, आणि होता येतं फुलपाखरांच्या पंखांइतकं कणखर !
पिकली पानं गळतात... मातीत रुजतात...नवे अंकूर जन्म घेतात...वृक्ष उमलतात...नियतीचं चक्र फिरत राहतं... आणि आपण - आपण हा सोहळा डोळ्यात जागवत जगतो... ते मिटेपर्यंत !
Monday, July 30, 2012
Wednesday, July 25, 2012
लाचार
दिसताच तू प्रिये मी, झालो पिसाट वारा
माझ्याच काळजाच्या, उडवूनी लक्तरांना !
प्रेमात यातना का, व्हाव्यात सांग राणी ?
हृदयातले उसासे, हृदयास छेदताना !
झाकून पापण्या मी, मिटलो यथावकाश
रचना तुझ्या मितीच्या, डोळ्यात नाचताना !
कितीवार पेलले तू, लाचार शब्द माझे
दुनियेसमोर त्यांच्या, अन लाज राखताना !
माझ्याच काळजाच्या, उडवूनी लक्तरांना !
प्रेमात यातना का, व्हाव्यात सांग राणी ?
हृदयातले उसासे, हृदयास छेदताना !
झाकून पापण्या मी, मिटलो यथावकाश
रचना तुझ्या मितीच्या, डोळ्यात नाचताना !
कितीवार पेलले तू, लाचार शब्द माझे
दुनियेसमोर त्यांच्या, अन लाज राखताना !
Wednesday, July 18, 2012
श्रावण
माझ्या अंगणात सये
घाली पाऊस फुगडी
उंबराच्या पायापाशी
गाय थांबेल न थोडी
जरा सांगून ये अशी
जा वाऱ्याच्या कानात
इथे सांग उसळती
आगडोम्ब श्रावणात
रानी दाटलेलं धुकं
माझ्या केसातून वाही
दिसे चहूकडे माझा
मला श्याम मनमोही
घाली पाऊस फुगडी
उंबराच्या पायापाशी
गाय थांबेल न थोडी
जरा सांगून ये अशी
जा वाऱ्याच्या कानात
इथे सांग उसळती
आगडोम्ब श्रावणात
रानी दाटलेलं धुकं
माझ्या केसातून वाही
दिसे चहूकडे माझा
मला श्याम मनमोही
Tuesday, July 17, 2012
केसरबाई केरकर
केसरबाई केरकर जेव्हा
मल्हार आळवत होत्या
माझ्या पणजोबांच्या
जुनाट ग्रामोफोनमधून -
मी तेव्हा घरातच होतो.
तू आलीस भिजून चिंब -
तूझ्या कुरळ्या बटेवरून
ओघळलो मी गालापर्यंत.
गाणं संपलं तेव्हा -
शोधलं मी खूप तुला !
मल्हार ऐकणं बहुधा
झेपत नसावं मला !
मल्हार आळवत होत्या
माझ्या पणजोबांच्या
जुनाट ग्रामोफोनमधून -
मी तेव्हा घरातच होतो.
तू आलीस भिजून चिंब -
तूझ्या कुरळ्या बटेवरून
ओघळलो मी गालापर्यंत.
गाणं संपलं तेव्हा -
शोधलं मी खूप तुला !
मल्हार ऐकणं बहुधा
झेपत नसावं मला !
Wednesday, July 11, 2012
विधान
कॉलनीसमोरील रस्त्यावर
फिरताना म्हणाली होतीस -
रस्ता संपेल, पण साथ, अं हं !
चौथ्या फेरीनंतर सप्तपदीत
सांगितलस ओलसर डोळ्यांनी -
प्रेम संपेल, पण मैत्री, अं हं !
आयुष्याच्या उतरणीवरही तू
चष्मा पुसत धीर दिलास -
जन्म संपला, पण विधान, अं हं !
फिरताना म्हणाली होतीस -
रस्ता संपेल, पण साथ, अं हं !
चौथ्या फेरीनंतर सप्तपदीत
सांगितलस ओलसर डोळ्यांनी -
प्रेम संपेल, पण मैत्री, अं हं !
आयुष्याच्या उतरणीवरही तू
चष्मा पुसत धीर दिलास -
जन्म संपला, पण विधान, अं हं !
Tuesday, July 10, 2012
थेंबांच गीत
तू कूस बदलल्यावर
खिडकीतून उडणाऱ्या
रसरसलेल्या थेंबात
अर्थ कितीसा उरतो ?
तू कूस बदलल्यावर
झोप रुसून गेलेल्या
डोळ्यातील अमावस्येत
चंद्र कितीसा उरतो ?
तू कूस बदलल्यावर
माझ्यातल्या पावसात
आणि बरसत्या देहात
जन्म कितीसा उरतो ?
खिडकीतून उडणाऱ्या
रसरसलेल्या थेंबात
अर्थ कितीसा उरतो ?
तू कूस बदलल्यावर
झोप रुसून गेलेल्या
डोळ्यातील अमावस्येत
चंद्र कितीसा उरतो ?
तू कूस बदलल्यावर
माझ्यातल्या पावसात
आणि बरसत्या देहात
जन्म कितीसा उरतो ?
Monday, July 9, 2012
वातीचं देणं
फुलपाखरांच्या पंखातून
बेमालूमपणे निसटणाऱ्या
रंगांचं;
इंद्रधनुच्या कुंचल्यातून
आभाळ गिरवणाऱ्या
हातांचं;
चंद्राच्या एका इशाऱ्यावर
आसमंतात झेपावणाऱ्या
लाटेचं;
हृदयाच्या काजळी समईत
दिवस-रात्र जळणाऱ्या
वातीचं;
देणं आहे माझं
कित्येक जन्मांचं !
बेमालूमपणे निसटणाऱ्या
रंगांचं;
इंद्रधनुच्या कुंचल्यातून
आभाळ गिरवणाऱ्या
हातांचं;
चंद्राच्या एका इशाऱ्यावर
आसमंतात झेपावणाऱ्या
लाटेचं;
हृदयाच्या काजळी समईत
दिवस-रात्र जळणाऱ्या
वातीचं;
देणं आहे माझं
कित्येक जन्मांचं !
Thursday, July 5, 2012
संध्याकाळ
त्याला होती घरटी बांधायची
मला भरकटायचच होतं
नशिबाच्या कपाळरेषात
मला हरवायचच होतं !
त्याला व्हायची सर्दी
नुसताच वारा लागून
काळ गोठवणाऱ्या नजरेचं
माझ्या मलाच कौतुक होतं !
अंधुक अंधुक दिवस
आणि कोमेजलेल्या रात्री
संध्याकाळच्या उजेडाचं
दोघांचही देणं होतं !
मला भरकटायचच होतं
नशिबाच्या कपाळरेषात
मला हरवायचच होतं !
त्याला व्हायची सर्दी
नुसताच वारा लागून
काळ गोठवणाऱ्या नजरेचं
माझ्या मलाच कौतुक होतं !
अंधुक अंधुक दिवस
आणि कोमेजलेल्या रात्री
संध्याकाळच्या उजेडाचं
दोघांचही देणं होतं !
Tuesday, July 3, 2012
मौन
तळ्याकाठी राहिलेलं आपलं मौन
रात्री जेव्हा तळ्यात उतरेल ...
चांदणवेलीवर चढून थेट
आणि माझ्याशी बोलतं होईल
तेव्हा तुझा निश्वास
वाऱ्याला आंदण देईल
फुलता फुलता राहिलेल्या
कळ्या-फुलांचे गुज !
रात्री जेव्हा तळ्यात उतरेल ...
चांदणवेलीवर चढून थेट
आणि माझ्याशी बोलतं होईल
तेव्हा तुझा निश्वास
वाऱ्याला आंदण देईल
फुलता फुलता राहिलेल्या
कळ्या-फुलांचे गुज !
Monday, July 2, 2012
होड्या
केल्या होत्या तेव्हा
शिडाच्या असंख्य होड्या
आता आठवत नाही
नेमक्या कधी!
कौलांवरून खाली
अन चिंचेच्या बाजूने
वहायचा मी होड्यातून
नदीपर्यंत!
पात्र नदीचं मोठं होत जायचं
मी लहान होत जायचा
होड्या बुडून गेल्यावरही
तरंगत राहायचा!
शिडाच्या असंख्य होड्या
आता आठवत नाही
नेमक्या कधी!
कौलांवरून खाली
अन चिंचेच्या बाजूने
वहायचा मी होड्यातून
नदीपर्यंत!
पात्र नदीचं मोठं होत जायचं
मी लहान होत जायचा
होड्या बुडून गेल्यावरही
तरंगत राहायचा!
Subscribe to:
Posts (Atom)
डोह
आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान जड पंखात साठवून फिरत राहतो स्मरत रा...
-
गडद झाडीचा रंग ओथंबून ओघळतो पाठीवर मानेवरून कांकणभर पाउस ठिबकतो वाहतो धुकट ओल्या बोटातून आभाळभर पाणी वाऱ्यानं हलावं तशी तुझी पावले...
-
पानातून सांडलेलं उन पिऊन , मातलेल्या केवड्याचा गंध ; अंधुक अंधुक उजेडातून , रापलेल्या देहाचा रंग ; वक्षांवरून पसरलेले – दो...
-
जाणवलं; तुझ्या बिलोरी डोळ्यात पाहताना. आठवलं; अता उकीरड्या जगात फिरताना. कळेल; दिवस कूस बदलेल तेव्हा. नाहीच कळालं कधी, तर अजून एक सं...