Posts

Showing posts from April, 2010
अता बरसशील हसत , झोकात सखा साजण माझा विरघळे मिठीत ! लागले तृप्तीचे डोहाळे छपरास भरू आला मेघ माझा जीव कासावीस ! रोवत तुझ्या सुगंधी टाचा भरत येतोस मोकळ्या खाचा ! पाट अत्तराचे तुझ्या वाहती दारातून हे झिरपती माझ्या खोल खोल हाडातून ! असा बरस तू पुन्हा माझी चातकाची प्यास मोहरलं झाड तुझं माझं घरटं भकास !