Posts

Showing posts from June, 2012

जोगिण

प्राचीन क्षितिजावरचा डोन्गर ओघळत येतो दरी-घाटातून थेट माझ्या खिडकीत मळवट भरलेल्या जोगिणीच्या डोळ्यातली, प्रत्येक तहान, तरी, सुकीच कशी राहते?

तहान

उंबऱ्याशी उभी वात विझे जळून थांबून ये दाटून आभाळ नाही वाऱ्या त्याचे भान रातराणीचा शहारा तिच्या ओल्या पाकळ्यात तिच्या भिवयीच्या खाली तिच्या सख्याची तहान काय ओढ काय भोग इथे दारोदार जाग नाही चाहूलही त्याची घरा पेलवेना अंग

वेलांटी आणि उकार

तू डोळे मी काजळ तू पाणी मी ओंजळ तू कडाडणारी वीज मी ढगांच्या पाठीवरचा वळ तू झोकात पक्ष्यांच्या पंखांच्या तालात मी झाडाच्या बुरुजावर वाऱ्याच्या मनात तू वेलांटी 'म' वरची मी उकार 'त' खालचा तू रात्र पौर्णिमेची मी चंद्र तिच्या भाळावरचा

आंठवणीतला प्राजक्त

आठवणींना बहर येतो तेव्हा दिसतेस मोरपंखी परकरात प्राजक्ताची फुलं वेचताना ! आयुष्याचा कहर होतो तेव्हा दिसतेस जडसर पापणीतून विकल डोह पेलताना ! उद्याचा सांगावा येतो तेव्हा दिसतेस काळाच्या वेलीवर पान पान फुटताना !

तराजू

ती येते कधी कधी नाक्यावरच्या दुकानात जाताना डोकावते माझ्या दहा बाय वीसच्या रकान्यात कसल्याश्या फुलाचा वास काळजात घुमत राहतो वाण्याच्या तराजूचा काटा कधी थांबतो कधी पडतो

पानी

भीगी पल्कोपे संभलता पानी तेरे रुख्सार से फिसलता पानी हथेलियोकी हीना का बदलके रंग तेरे दामन में काटे उगाता पानी तेरी महफ़िल से उठते तो हासिल ही क्या था हमें काफ़िर न बना ए बूंद-ए-शराब तेरी तबियत ना बिगाडदे पानी

भीती

सैरभैर झाल्या दिशा सुचेनासं झालं काही असा भिजवत आला जाता थोडा उरलाही असा पाउस पडतो कधी नदीच्या पल्याड धीर सुटू पाहे माझा आड वेळ रान आड

जेव्हा पाऊस येईल

पावसाच्या सरी जेव्हा येतील तुझ्या दारी ओटी ओटी भरून माया देशील ना गं बाई? ओल्या ओल्या मातीचा मग ढग घेतील भरून श्वास कोवळ्या कोवळ्या कळ्यांचे होतील वाऱ्यास सतत भास!

संधी

जाणवलं; तुझ्या बिलोरी डोळ्यात पाहताना. आठवलं; अता उकीरड्या जगात फिरताना. कळेल; दिवस कूस बदलेल तेव्हा. नाहीच कळालं कधी, तर अजून एक संधी देशील ना?

वक्त

मैत्रीचे किनारे धूसर होत जातात ........ प्रेमाचे उसासे विरळ होत जातात ....... ' वक्त चीज हि ऐसी हैं ' लेको ............. मी मी म्हणणारे फरफटत जातात .......

सावली

दिवस सरला, की रात्रीच्या अंधाऱ्या पंखातून छपरावर उतरणारे, घरातल्या ओल्या भिंतीवरून, सरपटत येणारे, माझ्यातून मला सोडवणारे, तुझ्या सावलीत मिसळून येतात मग काही अर्धे अधांतरी क्षण.