Posts

Showing posts from January, 2011

सातच्या बातम्या ... (बुध., २६/०१/२०११ - १४:१६)

                  सोनावणेंना आदरांजली , उत्सव शर्माला लाल सलाम ! पंडीत भीमसेन जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली ; माझं मुंजितलं नाव भीमसेन असल्याचा मला पहिल्यांदाच अभिमान वाटला !! पद्मश्री , पद्मभूषण आणि पद्मविभूषण या लॉटऱ्यांची सोडत झाली. ज्यांचे नशीब फळफळले(किंवा मरण लांबले), त्यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन !! एकाच घरातील तीन भारत रत्नं, अनुक्रमे- नेहरूजी (१९५५), इंदीराजी (१९७१) आणि राजीवजी (१९९१) यांच्या अमूल्य योगदानानंतर आता वीस वर्षांच्या (इंटर्वलनंतर), माननीय त्यागमूर्ती सोनियाजी राजीवजी गांधीजी (....जी जी रं ..जी..) यांना त्यांच्या हक्काचं ( घरचं ) रत्न सूपूर्द करावं. दिग्विजय सिंघ यांचा आणखी एक गौप्यस्फोट - " युसूफ पठाणच्या बॅटमध्ये स्प्रिंग्स आहेत !! " असिमानंद, अजमल कसाब आणि अफझल गुरू एकाच वर्गात शिकल्याचे उघडकीस. शाळेच्या मुख्याध्यापकाला त्वरीत पकडण्याचे आदेश - माननीय उपमुख्यमंत्री. शरद पवारांचे खरे वंशज फ्रान्समध्ये असल्याचा 'ठाकरे'शोध ! फ्रान्सची कुप्रसिद्ध राणी "मेरी अँटॉयने " आणि शरद पवारांचे डी एन ए जुळत असल्याचा पुरावा एका खा

भेट (बुध., ११/१०/२००६ - १२:४२)

भूलून गेलो , उडून गेलो, प्रीतवारा भिरभिरला लूटून नेला गर्भ उद्याचा, वर्तमानही हादरला ! सौंदर्याची सीमा आम्ही ठरवली नव्हती पुरी झाली खात्री अता, खट्याळ मनाला! बट मागे सारताना, पदराशी खेळताना; हाय अशी लाजलीस, त्या उपमा कशाला ? दूर तू उभी असून ,भासतेस जवळ तू अपुल्यातील अंतराचा, श्वास बरा संपला ! शब्द सारे कुचकामी, तव अधरांवर लडबडले सांडलीच मदीरा मग , काळ झिंग झिंगला! उरी माझ्या काळजाची , धडधड या थांबेना कसलयाशा वेदनेने , क्षण पुरा थरारला !

कसरत !

पहाटेचे पाच वाजताहेत. पंचविशी उलटली तरी अभ्यास सुटत नाही, याला काय म्हणावं ? असो. कितीही मिळालं तरी पुन्हा हवंच असतं काहितरी. आईनस्टाइननं सापेक्षतावाद सोडून याचा अभ्यास केला असता तर मला अधिक आनंद झाला असता. भौतिकशास्त्राचा विद्यार्थी असून देखील मला असं वाटावं ह्याचं मलाच कौतुक ! असो. "५०० माइल्स" ऐकतोय. सुरेख गाणं आहे. सावरकरांच्या "सागरा प्राण तळमळला"सारखा भाव आहे या गाण्यात. मातृभूमीचा विरह काय असतो हे सावरकरांनाच माहीत. आणि हो ५०० माइल्स वाल्यांना. विरह कोणाचाही का असेना फारच अगतिक करून सोडतो. असो. रिस्क आणि रिटर्न यांचं कोडं ज्याला सुटलं त्याला सगळंच सोपं. प्रेमात वेडे होणारे लोक एकाच कंपनीचे भरपूर शेअर्स घेउन ठेवतात !! मग कंपनी बुडाल्यावर वेड लागण्याचीच शक्यता अधिक नाही का ? म्हणूनच एक वित्त सल्लागार(भावी) या नात्यानं माझं असं सांगणं आहे की, तुमचा पोर्टफोलिओ थोडासा डाइवर्स करा. त्यात तुमच्या माता-पित्यांचे, भावा-बहिणींचे आणि मित्रांचे शेअर्स, फंड्स असू द्यात. असो. लिहिण्याची कसरत तब्येतीला चांगली असते असे म्हणतात. असो.