Posts

Showing posts from May, 2012

चाफा

चाफा अजून फुलतोच आहे वेचणारा हात कुठे दिसत नाही नभांच्या पिसाऱ्यातून हलणारा तो जांभळा ढग कुठे दिसत नाही आभाळ झुलवणारे थवे पक्षांचे अन त्यांचा गोफ कुठे दिसत नाही सांज वाहणारे पावसाळी डोळे अन साचलेली रात कुठे दिसत नाही ...

आडवाट

रस्त्या-रस्त्यावर मांडलेला, गावा-गावात पुजलेला, नियतीला सुचलेला, सत्वाचा व्यभिचार; चुकवत चुकवत आली झाडाच्या काळ्याभोर, अन अजिंक्य ढोलीत एका पक्ष्याची आडवाट...

कातळ

भरू येतो श्वास तुझी मिटली ओंजळ लागे आस सख्या होई गर्द डोळ्यांचे कातळ

गाणे

अर्थांचा एक अनामिक यात्रिक शब्दांच्या वाटांवरती गातो गाणे विटलेले थकलेले गाणे आतून आतून फुटलेले ...

दुपार

ग्रीष्मातली दुपार, तू, आणि मी .......... जेव्हा भेटतो वडाच्या फिकट सावल्यांत कधी तू माझ्यात, कधी उन्हात .......... आणि ओशाळलेली दुपार पारंब्या-पारंब्यात

आर्जव

पानातून गळला चंद्र साजणी ...... रातीच्या गाली झुले दव ............. वाऱ्याला आली पेंग जराशी ......... मिटली कळी त्या करी आर्जव .....

कधी मी

कधी मी, शब्दांवर अर्थाचे सावट ...... कधी मी, अर्थातील जळता पारा ...... कधी तव नयनातील आभाळी ......... मी लुकलुकणारा तारा .....

गजरा

तुला गजरा माळताना पाहिलं ........ ...मन फूल फूल गुंतताना पाहिलं !