कसरत !

पहाटेचे पाच वाजताहेत.
पंचविशी उलटली तरी अभ्यास सुटत नाही, याला काय म्हणावं ?
असो.

कितीही मिळालं तरी पुन्हा हवंच असतं काहितरी. आईनस्टाइननं सापेक्षतावाद सोडून याचा अभ्यास केला असता तर मला अधिक आनंद झाला असता. भौतिकशास्त्राचा विद्यार्थी असून देखील मला असं वाटावं ह्याचं मलाच कौतुक !
असो.

"५०० माइल्स" ऐकतोय. सुरेख गाणं आहे. सावरकरांच्या "सागरा प्राण तळमळला"सारखा भाव आहे या गाण्यात. मातृभूमीचा विरह काय असतो हे सावरकरांनाच माहीत. आणि हो ५०० माइल्स वाल्यांना. विरह कोणाचाही का असेना फारच अगतिक करून सोडतो.
असो.

रिस्क आणि रिटर्न यांचं कोडं ज्याला सुटलं त्याला सगळंच सोपं. प्रेमात वेडे होणारे लोक एकाच कंपनीचे भरपूर शेअर्स घेउन ठेवतात !! मग कंपनी बुडाल्यावर वेड लागण्याचीच शक्यता अधिक नाही का ? म्हणूनच एक वित्त सल्लागार(भावी) या नात्यानं माझं असं सांगणं आहे की, तुमचा पोर्टफोलिओ थोडासा डाइवर्स करा. त्यात तुमच्या माता-पित्यांचे, भावा-बहिणींचे आणि मित्रांचे शेअर्स, फंड्स असू द्यात.
असो.

लिहिण्याची कसरत तब्येतीला चांगली असते असे म्हणतात.
असो.

Comments

Popular posts from this blog

सावज !

संधी

मौन