सातच्या बातम्या ... (बुध., २६/०१/२०११ - १४:१६)

                 

सोनावणेंना आदरांजली ,
उत्सव शर्माला लाल सलाम !
पंडीत भीमसेन जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली ;
माझं मुंजितलं नाव भीमसेन असल्याचा मला पहिल्यांदाच अभिमान वाटला !!

पद्मश्री , पद्मभूषण आणि पद्मविभूषण या लॉटऱ्यांची सोडत झाली. ज्यांचे नशीब फळफळले(किंवा मरण लांबले), त्यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन !!
एकाच घरातील तीन भारत रत्नं, अनुक्रमे- नेहरूजी (१९५५), इंदीराजी (१९७१) आणि राजीवजी (१९९१) यांच्या अमूल्य योगदानानंतर आता वीस वर्षांच्या (इंटर्वलनंतर), माननीय त्यागमूर्ती सोनियाजी राजीवजी गांधीजी (....जी जी रं ..जी..) यांना त्यांच्या हक्काचं ( घरचं ) रत्न सूपूर्द करावं.

दिग्विजय सिंघ यांचा आणखी एक गौप्यस्फोट -
" युसूफ पठाणच्या बॅटमध्ये स्प्रिंग्स आहेत !! "

असिमानंद, अजमल कसाब आणि अफझल गुरू एकाच वर्गात शिकल्याचे उघडकीस.
शाळेच्या मुख्याध्यापकाला त्वरीत पकडण्याचे आदेश - माननीय उपमुख्यमंत्री.

शरद पवारांचे खरे वंशज फ्रान्समध्ये असल्याचा 'ठाकरे'शोध !
फ्रान्सची कुप्रसिद्ध राणी "मेरी अँटॉयने " आणि शरद पवारांचे डी एन ए जुळत असल्याचा पुरावा एका खासगी दूरचित्रवाहिनीवर सादर ..

यावर्षीच्या राष्ट्रपती शौर्य पुरस्कारांसाठी जगन्मोहन रेड्डी, राज ठाकरे आणि देवबंदचे अध्यक्ष (माजी ) वस्तानवी यांच्यात चुरस !


...क्रमशः

Comments

Popular posts from this blog

सावज !

संधी

मौन