नाटक
आयुष्य म्हणजे तीन अंकी नाटक
काही नाटकांचे तीनही अंक वेळेत सुरू होउन वेळेत बंद होतात,
काही नाटकात पडदे वेळेआधीच पडतात,
काही नाटकं तिकिटं खपूनही सुरू होत नाहीत,
काही नाटकं अंक संपूनही संपत नाहीत !
...काही नाटकांत प्रेक्षकांना बसायला जागा मिळत नाही,
काही नाटकं मोकळ्या खुर्च्यांसाठी होतात,
काही नाटकं प्रेक्षक यायच्या आधीपासून सुरू असतात,
काही नाटकं प्रेक्षक गेल्यावरही सुरुच राहतात,
काही अर्थपूर्ण आणि काही मजेशीर असतात,
पण बरीचशी निरर्थक आणि भोंगळ असतात !
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment