सातच्या बातम्या !




"आडवाणींच्या रथ मार्गावर विस्फोटकं सापडली!" (बहुधा दिवाळीत न उडालेले फटाके कोणीतरी टाकले असावेत. अतिशयोक्ती करावी, पण किती ? ----- मा. बबलू ऊठसूट, युवा काँग्रेस नेते)
"रा वन ने मोडले सर्व रेकॉर्ड!" (रेकॉर्ड करणारेच इतके थोर. माय नेम इज खान आणि दबंग ह्या दोन नटांनी टूकारपणाचे रेकॉर्ड मोडीत काढायचे ठरवलेले दिसते. ---- इति ऊद्धव ठोकरे)
"पॅलेस्टाइनला सभासदत्व दिल्याने अमेरिकेने युनेस्कोला दिली जाणारी मदत थांबवली" (कोणीतरी अमेरिकेला दिली जाणारी रसद थांबवा अता, पण जपून. ---- इति स्व. सद्दाम हुस्सैन ) 
"साखर कारखान्यांनी आणि दूध उत्पादकांनी सहकाराची तत्वं धाब्यावर बसवली !" (कमॉन, गिम्मे अ ब्रेक ! --- समडोळीहून सिम्रन, राज, आनी डॉली )
"लेडी गागा ने दिल्लीकरांना दिली संगीताची अभूतपूर्व मेजवानी" (आता कळलं, हे चॅनलवाले ढेकर का देत सुटलेत ते. ---- इति कोचरेकर गुरूजी, मुक्काम पोस्ट बटाट्याची चाळ)
"मणिपूरमध्ये जातीसंघर्ष तीव्र !" (जाती ! म्हणजे, माणसे राहतात की काय तिथे ? ----- इति श्री. सोनिया गँधी )

Comments

Popular posts from this blog

सावज !

संधी

मौन