तूझी आठवण येते...

श्रावणाने निरोप घेतल्यानंतरही,
एखादी हट्टी सर,
फक्त मातीच्या प्रेमाखातर,
तीला मनभर भिजवून जाते,
आणि मग मातीचं गंधगीत
वारा गुणगुणायला लागतो,
तेव्हा
तूझी आठवण येते.
असल्या असंख्य खोप्यांची तीव्र जखम
ओलसर होताना, दूर कुठे तरी,
एखाद्याच पाखराची रात्रांधळी फडफड,
अंधाराचे तख्त फोडू पाहते,
तेव्हा
तूझी आठवण येते.
दूरवरच्या अस्पष्ट टेकड्या,
जेव्हा उगाचंच बडबड करू लागतात,
अगदीच अर्थशून्य,
आणि बांध फोडून,
पिकात शिरू पाहण्याऱ्या,
त्या झऱ्याची भाषा,
अगदीच समजेनाशी होते,
तेव्हा
तूझी आठवण येते.
कुठल्याशा काठाशी रुजलेल्या,
आणि भित्रट तृणात वाढलेल्या रानफुलाशी,
मी  मुक्यानेच बोलू पाहतो,
जेव्हा त्याची जगण्याची भाषा,
माझ्या हृदयाचा ताल बनते,
तेव्हा
तूझी आठवण येते.

Comments

  1. A confused, yet pragmatic approach in your poems reveals your personality.

    Abhijeet
    http://quickflickk.com
    http://books.quickflickk.com

    ReplyDelete
  2. मातीचं गंधगीत
    वारा गुणगुणायला लागतो

    Bhari

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावज !

संधी

मौन