जेव्हा पाऊस येईल

पावसाच्या सरी जेव्हा
येतील तुझ्या दारी
ओटी ओटी भरून माया
देशील ना गं बाई?

ओल्या ओल्या मातीचा मग
ढग घेतील भरून श्वास
कोवळ्या कोवळ्या कळ्यांचे
होतील वाऱ्यास सतत भास!

Comments

Popular Posts