Tuesday, June 12, 2012

तराजू

ती येते कधी कधी
नाक्यावरच्या दुकानात
जाताना डोकावते माझ्या
दहा बाय वीसच्या रकान्यात
कसल्याश्या फुलाचा वास
काळजात घुमत राहतो
वाण्याच्या तराजूचा काटा
कधी थांबतो कधी पडतो

No comments:

Post a Comment

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...