Wednesday, June 13, 2012

आंठवणीतला प्राजक्त

आठवणींना बहर येतो
तेव्हा दिसतेस
मोरपंखी परकरात
प्राजक्ताची फुलं वेचताना !
आयुष्याचा कहर होतो
तेव्हा दिसतेस
जडसर पापणीतून
विकल डोह पेलताना !
उद्याचा सांगावा येतो
तेव्हा दिसतेस
काळाच्या वेलीवर
पान पान फुटताना !

No comments:

Post a Comment

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...