वेलांटी आणि उकार

तू डोळे मी काजळ
तू पाणी मी ओंजळ
तू कडाडणारी वीज
मी ढगांच्या पाठीवरचा वळ
तू झोकात पक्ष्यांच्या
पंखांच्या तालात
मी झाडाच्या बुरुजावर
वाऱ्याच्या मनात
तू वेलांटी 'म' वरची
मी उकार 'त' खालचा
तू रात्र पौर्णिमेची
मी चंद्र तिच्या भाळावरचा

Comments

Post a Comment

Popular Posts