Wednesday, June 20, 2012

तहान

उंबऱ्याशी उभी वात
विझे जळून थांबून
ये दाटून आभाळ
नाही वाऱ्या त्याचे भान
रातराणीचा शहारा
तिच्या ओल्या पाकळ्यात
तिच्या भिवयीच्या खाली
तिच्या सख्याची तहान
काय ओढ काय भोग
इथे दारोदार जाग
नाही चाहूलही त्याची
घरा पेलवेना अंग

1 comment:

डोह

आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान  जड पंखात साठवून फिरत राहतो  स्मरत रा...